By  
on  

बरोबर २० वर्षांपूर्वी ह्या प्रसिध्द अभिनेत्याने साकारली होती श्री प्रभू रामचंद्राची भूमिका

हल्ली सोशल मिडीयाच्या माध्यमामुळे कलाकारांंच्या अनेक गोष्टी चाहत्यांसमोर येतात. कलाकार अनेकदा इथे आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देतात, त्यामुळे चाहत्यांनासुध्दा त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी जाणून घेण्याची संधी मिळते. 

मराठी सिनेमा, मालिका आणि नाटक यांमधून आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारा सिनेसृष्टीचा आघाडीचा अभिनेता सुबोध भावे याने असाच आपल्या कारकिर्दीतल्या एका खास व्यक्तिरेखेच्या आठवणींना पोस्टच्या माध्यमातून उजाळा दिला आहे. 

सुबोध भावे म्हणतो," बरोबर २० वर्षांपूर्वी, साल २०००,गीतरामायण या तेव्हाच्या Alfa Marathi(आताच झी मराठी)
वरील मालिकेतून "प्रभू श्री राम " यांच्या भूमिकेतून माझ्या व्यावसायिक अभिनेता म्हणून प्रवासाला सुरवात झाली,आणि नंतर अनेक मालिकांमधून तुमच्या समोर आलो ,ते आत्ताच्या "चंद्र आहे साक्षीला"पर्यंत."प्रभू श्री राम ते श्रीधर काळे". Television नि खऱ्या अर्थाने ओळख दिली आणि घराघरात पोहोचवलं.
आमच्या पिढीला लाभलेलं वरदान!

जागतिक दूरचित्रवाणी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

 

 

जागतिक दूरचित्रवाणी दिनाच्या दिनाच्या निमित्ताने सुबोधने ही खास पोस्ट शेअर केली आहे. चाह्तायंनी त्याच्या या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive