अभिनेत्री संस्कृतीच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या डान्सचे असंख्य चाहते आहेत. अनेक रंगारंग सोहळ्यांमध्ये संस्कृतीच्या डान्सटा जलवा पाहायला मिळतो. संस्कृती बालगुडेचे नवनवीन फोटोशूट म्हणजे चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. नेहमीच स्टायलीश राहण्यास पसंती देणारी संस्कृती विविध आऊटफिट्समधून रसिकांसमोर येते. नुकतंच तिने पुन्हा एकदा एक नवं फोटोशूट केलं आहे.
संस्कृती सोशल मिडियावर बरीच अॅक्टीव्ह असते. अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांशी शेअर करत असते.
परंतु संस्कृतीने नुकतंच फेस्टिव्ह सीझनमध्ये आईची साडी नेसली होती.
या साडीत संस्कृतीच्या घायाळ करणा-या अदा पाहायला मिळतायत.
संस्कृतीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे.