By  
on  

रिंकू राजगुरुच्या 'कागर'चं हे पोस्टर तुम्ही पाहिलंत का?

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री रिंकु राजगुरूची प्रमुख भूमिका असलेल्या ‘कागर’ या चित्रपटाविषयी तिच्या फॅन्समध्ये प्रचंड उत्सुकता आहे. रिंकूची बारावीची परिक्षा असल्याने ‘कागर’चं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं होतं. आता या सिनेमाचं एक नवं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. रिंकूने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हे पोस्टर शेअर करत,"तळपत्या उन्हात झळाळून निघणार,तिच्या स्वप्नांचा गुलाल उधळणार जुना जाणार तेव्हाच नवा येणार…'कागर' " असं म्हटलं आहे. तर पोस्टरवर रिंकूसाठी पुन्हा एकदा मानाने झळकायला, ती येतेय तुमची मनं जिंकायला!, असा उल्लेख करण्यात आला आहे.

सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या ‘उदाहरणार्थ’ या संस्थेने ‘कागर’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी ‘कागर’चं दिग्दर्शन केलं आहे. महत्त्वाची बातमी म्हणजे 'कागर'च्या प्रस्तुतीची धुरा वायाकॉम 18 मोशन पिक्चर्सने सांभाळली आहे.

 

https://www.instagram.com/p/Bu3SqeaBkHz/

Author

Recommended

PeepingMoon Exclusive