‘वाजले की बारा’ म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचायला लावणारी अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. प्रत्येक सिनेमांमधून तिचा सहज सुंदर अभिनय आपल्याला पाहायला मिळतो. अमृताच्या अभिनयासोबतच तिच्या लुक्सचीसुध्दा खुप चर्चा होते. ती नेहमीच स्टायलीश राहण्यास पसंती देते.
अमृताचा मराठी प्रमाणेच हिंदी सिनेसृष्टीतसुध्दा खुप मोठा चाहता वर्ग आहे. आज अमृताचा वाढदिवस. यानिमित्ताने चाहत्यांकडूनच नाही तर सिनेसृष्टीतील सहकलाकारांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
सई ताम्हणकर
सिध्दार्थ चांदेकर
सोनाली खरे