By  
on  

भरत परत आणणार 'मोरुची मावशी'

दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांनी 'मोरुची मावशी' हे नाटक आपल्या सदाबहार अभिनयाने अजरामर केलं. या नाटकातील काही दृश्य आणि संवाद आजही डोळ्यासमोर येतात.या नाटकातलं 'टांग टिंग टिंगा' हे गाणं आणि त्यावर विजयजींनी केलेला अफलातून नाच रसिक प्रेक्षक विसरुच शकत नाही.

'मोरुची मावशी' ही अभिजात कलाकृती मराठी रंगभूमीसाठी मैलाचा दगड ठरली होती. हरहुन्नरी अभिनेता भरत जाधव हे नाटक परत घेऊन येतोय. यापूर्वीसुध्दा भरतने या नाटकाचे यशस्वी प्रयोग केले होते.  मावशीची भूमिका साकारुन भरत पुन्हा धम्माल उडवण्यासाठी सज्ज झाला आहे. या नाटकाव्दारे तो विजय चव्हाण यांना आदरांजली वाहणार आहे.

सर्वच रसिक प्रेक्षकांना आता भरत पुन्हा साकारत असलेल्या मोरुच्या मावशीचे वेध लागले आहेत.

https://www.instagram.com/p/yoovqqsJx1/?utm_source=ig_embed

Author

Recommended

PeepingMoon Exclusive