By  
on  

लंडनमध्ये या खास दोस्तांसोबत शूटींग एन्जॉय करतेय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मिडीयावर किती सक्रीय असते हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. सतत नवनवे फोटोशूट, विविध अपडेट्स ती या माध्यमांतून चाहत्यांपर्यंत पोहचवते. आता तर सोनालीने केलेली खास दोस्तांसोबतची पोस्ट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतेय. मिनीयन, पू या बाहुल्यांसोबत थेट लंडनमधून सोनालीने हे क्यूटवाले फोटो शेअर केले आहेत. तेव्हा सोनाली लंडनमध्ये आता काय करतेय, हे जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुकता असेलच. 

अभिनेता- लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमेच्या आगामी सिनेमाचं लंडनमध्ये शूटींग सुरु झालं आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतच इंग्लंडमध्ये सुरु करण्यात आल्याचं हेमंतने त्याच्या सोशल मिडीया पोस्टमधये म्हटलंय. हेमंत लिहीतो की, "नवा सिनेमा...इंग्लंड मधे शुट सुरू" पण या व्यतिरिक्त हेमंतने सिनेमाविषयी  कुठलीच माहिती उलगडलेली नाही. पण त्याच्या पोस्टमध्ये अभिनेते-दिग्दर्शक लोकेश गुप्ते आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पाहायला मिळाले. यावरुन सिनेमाबाबतची उत्सुकता वाढली. 

 

 

करोनानंतरच्या काळात पुन्हा सिनेमाच्या सेटवर आणि तेसुध्दा परदेशात जाऊन काम सुरु करण्याचा सोनालीला प्रचंड आनंद झाला आहे.  ती हे क्युट फोटो शेअर करत म्हणते, ही उत्साह वाढवणारी कौतुकास्पद पोस्ट आहे. 

तेव्हा आता चाहत्यांना हेमंत ढोमे, सोनाली कुलकर्णी आणि लोकेश गुप्ते यांच्या या आगामी सिनेमाच्या पुढील घोषणेची उत्सुकता लागली  आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive