अग्गंबाई ! सासूबाईंनी बनवलं चमचमीत चिकन सागुती, पाहा Video

By  
on  

अग्गंबाई सासूबाई फेम आसावरी म्हणजेच बबड्याची आई उर्फ अभिनेत्री निवेदिता सराफ अवघ्या महाराष्ट्राची लाडकी आहे.मालिकेत जशी आसावरी सुगरण आहे, तशीच ती प्रत्यक्ष आयुष्यातसुध्दा आहे. निवेतदिता सराफ यांना विविध पदार्थ करुन पाहायला आणि त्याच्या रेसिपीज सर्व चाहत्यांशी शेअर करायला खुप आवडतं. त्यांचं निवेदिता सराफ रेसिपीज नावाचं एक युट्यूब चॅनेल आहे. त्याद्वारे त्या विविध टेस्टी रेसिपीज चाहत्यांना करुन दाखवतात. 

गोवा आणि गोव्याचे पदार्थ म्हणजे सर्वांचाच विक पॉईंट. गोवा म्हटलं की फिश आणि चिकन हे ओघाने आलेच. म्हणून निवेदिता ताईंनी नुकतंच गोव्याची टिपीकल पण फेमस डिश चिकन सागुती रसिक चाहत्यांना करुन दाखवलीय. ती चमचमीत रेसिपी पाहून तुमच्या तोंडाला पाणी नाही सुटलं तरच नवल !

यापूर्वी एकदा निवेदिता ताईंनी गोव्याची स्पेशल डिश  फिश इन रिचीएडो मसाला करुन दाखवली होती.

 

निवेदिता ताईंच्या या रेसिपी स्पेशल युट्यूब चॅनलला चाहत्यांकडून भरभरुन प्रतिसाद मिळतोय.  

Recommended

Loading...
Share