मराठी सिनेसृष्टीत सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर आपलं स्थान निर्माण करणारी लाडकी अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी. ती विविध आऊटफिट्समधले फोटो नेहमी चाहत्यांशी शेअर करते. सोनालीच्या प्रत्येक फोटोशूटला चाहते भरभरुन प्रतिसाद देतात. कारण, तिचं प्रत्येक फोटोशूट हे खासच असतं.
डान्सिंग क्विन साईज लार्ज-फुल चार्ज या शोची परिक्षक असलेली सोनाली नेहमीच मनमोहक आऊटफिटमध्ये पाहायला मिळते. नुकतंच तिने फरच्या या वेस्टर्न स्टाईलच्या लेहंग्यामधून सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तिचा हा दिलखेचक अंदाज चाहत्यांना प्रचंड भावतोय.
सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. चाहत्यांशी कनेक्ट राहायला तिला आवडतं.
ह्या फरच्या पिंक टॉपमध्ये सोनालीच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत.
सोनालीचा हा घायाळ करणारा अंदाज पाहून अप्सरा आली..असंच म्हणावं लागेल.
दरम्यान, सोनालीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर ती लंडनमध्ये हेमंत ढोमेच्या आगामी डेट भेट या सिनेमाचं शूटींग करतेय. लवकरच हा नवा कोरा सिनेमा रसिकांच्या भेटीला येतोय.