म्हणून स्पृहा जोशीने पतीसोबतचा हा रोमॅण्टिक फोटो केला शेअर

By  
on  

एक गुणी अभिनेत्री, उत्तम कवियत्री आणि तितकीच लाडकी निवेदिका म्हणून स्पृहा जोशी सिनेसृष्टीत ओळखली जाते. मराठीसोबतच हिंदीतही तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. मराठी मालिका, नाटक , सिनेमे याचबरोबर स्पृहाने हिंदी-मराठी वेबसिरीजमधूनही आपली खास ओळख निर्माण केली आहे. स्पृहा जोशी आणि तिचे पती वरद लघाटे यांच्या लग्नाला आज सहा वर्ष पूर्ण झाली.

 

लग्नाच्या सहाव्या वाढदिवसानिमित्त स्पृहाने पती सोबतचा एक रोमॅण्टीक फोटो शेअर करत त्याला या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री स्पृहा जोशी हिनं २८ नोव्हेंबर २०१४ रोजी वरद लघाटे सोबतलग्न गाठ बांधली होती.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

 

गंमत म्हणजे स्पृहाचा पती वरदने मराठी सिनेसृष्टीत छोटासा डेब्यूही केला आहे.  अभिनेत्री स्पृहा जोशीचा 'होम स्वीट होम' हा सिनेमा दोन वर्षांपूर्वी रिलीज झाला  आहे. अभिनेते ऋषिकेश जोशी दिग्दर्शित  ह्या सिनेमात वरद  'इकडून तिकडे' ह्या गाण्यात खास झळकले आहेत. 

 

स्पृहा आणि वरद हे ंमेड फॉर इच अदर असं कपल आहे. दोघांची क्षेत्रं जरी वेगळी असलाी तरी ते कायम एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. या गोड जोडीला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पिपींगमून मराठीतर्फे खुप खुप शुभेच्छा ! नांदा सौख्य भरे !

Recommended

Loading...
Share