अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे आता रोमॅंटिक सिनेमा आणणार प्रेक्षकांच्या भेटीला

By  
on  

मुळशी पॅटर्न, देऊळ बंद आणि आगामी सरसेनापती हंबीरराव या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे आता रोमॅंटिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. या आगामी सिनेमाच्या माध्यमातून ते कधीही न हाताळलेला विषय प्रेक्षकांसमोर सादर करणार आहेत त्यामुळे या सिनेमाबाबतची उत्सुकता वाढली आहे.

‘कोल्हापूर टू बुलढाणा व्हाया इस्त्राइल’ असं प्रवीण यांच्या नव्या सिनेमाचं नाव आहे. प्रवीण यांचा हा सिनेमा लव्हस्टोरी असला तरी सामान्य सिनेमांसारखा नाही. या सिनेमाचंही शेतक-यांशी काहीतरी खास कनेक्शन आहे. 
“इस्त्राइलमध्ये शेतीसाठी अनुकूल परिस्थिती नाही. मात्र, तरीदेखील त्यांनी शेतीमध्ये बराच विकास केला आहे. माझ्या कथेतील पात्रदेखील याच विषयाचा अभ्यास करताना दिसतील.’ असं ते यावेळी म्हणाले. प्रवीण तरडे सलमानच्या आगामी ‘राधे’ सिनेमात झळकणार आहेत.

Recommended

Loading...
Share