‘लागीरं......’ नंतर अज्या आणि शितली ‘चाहूल’साठी एकत्र

By  
on  

‘लागीरं झालं जी’ मालिका संपून कित्येक दिवस लोटले असले तरी प्रेक्षकांचं अज्या आणि शितलीवरचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. अज्या आणि शितलीच्या केमिस्ट्रीवर प्रेक्षकांनी जीवापाड प्रेम केलं आहे. 
यापुर्वी नितीश चव्हाण आणि शिवानी बावकर यांच्यातील रोमॅंटिक केमिस्ट्री ‘खुळाच झालो गं’ या गाण्यातून प्रेक्षकांना अनुभवता आली होती.

 

 

आता पुन्हा ही जोडी चाहूल या गाण्यासाठी एकत्र आली आहे. शितली म्हणजेच शिवानीने नुकतंच या गाण्याचं पोस्टर शेअर केलं आहे. यामध्ये नितीश आणि शिवानीचा रोमॅंटिक अंदाज दिसतो आहे. ‘तुम्ही कधी कोणावर इतकं जिवापाड प्रेम केलंय का, की त्याचं हसणं पण तुमचं आयुष्य कलरफुल करत’. हे कॅप्शन देत शिवानीने हा फोटो शेअर केला आहे. चाहते आता या दोघांची रोमॅंटिक केमिस्ट्री गाण्यातून अनुभवायला उत्सुक असतील यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share