अजिंक्य-शितलीची ही गुड न्यूज कळली का?

By  
on  

सीमेवर लढताना हाताला दुखापत झाल्यानंतर अजिंक्य गावी परतला खरा पण त्यांनतर सर्वचजण चिंतेत होते. अजिंक्यने पुन्हा सीमेवर जाऊ नये अशी शीतल आणि अजिंक्यच्या घरच्यांची कळकळीची विनंती होती. पण शीतल आणि अजिंक्य आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांना सतत देशसेवेचं महत्त्व पटवून देत होते. परंतु घरच्यांचा विरोध कायम होता. अजिंक्य एकदा शीतलीला म्हणतोसुध्दा "10 रुपयाच्या कफनात गुंडाळून जाण्यापेक्षा, चीतेवर तिरंग्यात लपेटून जाण्याची शानच काही और आहे. याचदरम्यान भैय्या आणि जयडीसुध्दा या दोघांच्या अडचणी कमी करण्याऐवजी आणखी भर घालतायत.

पण अशातच शीतली आणि अजिंक्यच्या आयुष्यात एका गोड बातमीची चाहूल लागलीय. इथे अजिंक्यला पोस्टिंगचं पत्र येत प्रमोशनची आनंद वार्ता मिळालीय तर शीतलीनेच त्याला तुम्हाला बाबा म्हणून प्रमोशन मिळाल्याचंही सांगितलंय. दोघांचाही गगनात मावेनासा झालाय. डॉक्टरांनी आता शितलीला स्वत:ची काळजी घेण्यास सांगितलंय, आता नेमकं पुढे काय घडणार,अजिंक्य सीमेवर परतल्यावर भैय्या आणि जयडी शितलीला कुठला त्रास तर नाही ना देणार हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा, 'लागिरं झालं जी'

https://www.instagram.com/p/Bu-f75zAjYN/

Recommended

Share