गोव्याच्या किना-यावर पतीसोबत व्हेकेशन एन्जॉय करतेय ही प्रसिध्द मराठी अभिनेत्री

By  
on  

एक गुणी अभिनेत्री म्हणून मृण्मयी  देशपांडेला आपण सर्वच ओळखतो. पण तिने एक गुणी दिग्दर्शिका असल्याचंसुध्दा मन फकीरा या सिनेमातून सिध्द केलं आहे. आजच्या तरुणाईचा नात्यांचा झालेला गुंता तिने या सिनेमाद्वारे अलवार उलगडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. लवकरच मृण्मयीचं दिग्दर्शन असलेला मनाचे श्लोक हा आगामी सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय. दरम्यान, अनलॉकमध्ये शूटींग शेड्यूलमधून छान ब्रेक घेत मृण्मयी सध्या पती स्वप्निल राव यांच्यासोबत मस्त रोमॅण्टीक व्हेकेशन एन्जॉय करतेय.

 

मृण्मयी आणि तिचे पती स्वप्निल राव हे गोवा व्हेकेशनवर आहेत. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणारी मृण्मयी तिथले छान छान फोटो चाहत्यांसोबत शेअर करतेय. 

 

 

गोव्याच्या किना-यावर हे कपल छान क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसतंय.  

 

मृण्मयी देशपांडेच्या या रोमॅण्टिक गोवा डायरीजवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव  सुरु केला आहे. 

 

अनेकदा मृण्मयी पतीसोबतच्या हॉलिडेजचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करते. 

 

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने बिझनेसमन स्वप्नील रावसोबत ३ डिसेंबर २०१६ साली लग्न केले.या दोघांची केमिस्ट्री पाहून वाटते यांचे लव्हमॅरेजच आहे. 

 

Recommended

Loading...
Share