By  
on  

आदिनाथ कोठारे उतरला दिग्दर्शनात, सिनेमाच्या निर्मितीची धुरा प्रियांका चोप्राच्या हाती

आदिनाथ कोठारे हे मराठी सिनेसृष्टीमधील प्रथितयश नाव आहे. आदिनाथने आतापर्यंत अनेक सिनेमा आणि मालिकांमधून अभिनयाची छाप पाडली आहे. पण आता आदिनाथने एक पाऊल पुढे टाकलं आहे. तो आता दिग्दर्शनाची धुरा हाती घेणार आहे. महाराष्ट्रात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. या प्रश्नावर भाष्य करणारा ‘पाणी’ नावाचा सिनेमा आदिनाथ दिग्दर्शित करत आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार या सिनेमाची निर्मिती प्रियांका चोप्रा करत आहे. प्रियांकाची निर्मिती संस्था ‘पर्पल पेबल्स’दवारे या सिनेमाची निर्मिती केली जाणार आहे. ‘या शुटींगसाठी टीमने अतोनात कष्ट केलं आहे. अगदी कडक उन्हातही शूट करावं लागलं आहे. पण या सिनेमाच्या निर्मितीचा प्रामाणिक हेतू प्रत्येकाचाच असल्याने हे शक्य झालं आहे. ‘ असं आदिनाथने सांगितले. याशिवाय प्रियांका आणि मधू चोप्रा यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दलही त्याने आभार मानले आहेत.

https://twitter.com/adinathkothare/status/996381843514712064

 

Recommended

PeepingMoon Exclusive