दोन दिवसांपूर्वीच म्हणजेच 14 मार्च रोजी सायंकाळी सीएसएमटी स्थानक आणि टाईम्स ऑफ इंडिया यांना जोडणारा पादचारी पूल अचानक कोसळला आणि या दुर्घटनेत सहा नागरिकांचा नाहक बळी गेला तर जवळपास 40 जण जखमी झाले. या दुर्दैवी घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजीचा सूर उमटतोय. या घटनेबद्दल नेहमीच एक जबाबदार नागरिकाची भूमिकेत असणा-या अभिनेत्री रेणूका शहाणे यांनी ट्विटरवरुन आपली प्रतिक्रीया दिली आहे.
रेणूका शहाणे म्हणतात, " मुंबईतील आणखी एक पूल कोसळला. अतिशय दु:खद घटना. आपल्या आर्थिक राजधानीची ही परिस्थिती दयनीय आहे! आपण नेहमी नागरिकांचे प्राण गेल्या नंतरच जागे का होतो? Problem is there is no accountability! दुर्दैवी। ज्यांचे प्राण गेले त्यांच्या आत्म्यास शांति लाभो। ज़खमी लवकर बरे होवो!"
आपण नेहमी नागरिकांचे प्राण गेल्यानंतरच जागे का होतो? असा खडा सवाल त्यांनी प्रशासनाला केला आहे.
https://twitter.com/renukash/status/1106203475895963649