‘सारेगमप लिटिल चॅम्प’चे विजेतेपद पटकावणारी गायिका कार्तिकी गायकवाड लग्नबंधनात अडकली आहे. व्यावसायिक रोनित पिसेशी कार्तिकीचा विवाह संपन्न झाला. अनलॉकमध्ये जुलै महिन्यात कार्तिकीचा साखरपुडा पार पडला. त्यावेळच्या तिच्या फोटोंची आणि व्हिडीओंची बरीच चर्चा रंगली होती. आता मोजक्या नातेवाईक व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत तिचा व रोनितचा विवाहसोहळा पार पडला.
कार्तिकीच्या लग्नासाठी खास अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड व गायिका आर्या आंबेकर यांची खास उपस्थिती दिसली. दोघींनी सोशल मिडीयावर या लग्नसोहळ्यातले खास क्षण चाहत्यांशी शेअर केले आहेत.
आपल्या खणखणीत आवाजाने वेड लावणारी गाणी गाऊन कार्तिकी गायकवाडने रसिक प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केलं आहे.
कार्तिकिचा पती रोनित पिसे हा पुण्याचा राहणारा असून इंजिनीअर आहे. विशेष म्हणजे रोनितलाही संगीताची आवड आहे. तो उत्तम तबलावादक आहे. गायकवाड कुटुंब आळंदीत राहत असून कार्तिकी आपले वडील आणि गुरू कल्याणजी गायकवाड यांच्या संगीताचा वारसा चालवते.