सुव्रत जोशी पोहोचला थेट युनिव्हर्सल स्टुडियोत, शेअर केला फोटो

By  
on  

सुव्रत जोशी हे नाव आपल्यापैकी अनेकांना ‘दिल दोस्ती दुनियादारी'मालिकेमुळे माहीत झालं आहे. पण सुव्रतची आता नवीन ओळख ‘अमर फोटो स्टुडीयो’ या नाटकामुळे निर्माण झाली आहे. या नाटकाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. या नाटकाची चर्चा सातासमुद्रापार पोहोचली आहे. त्यामुळे या नाटकाचे प्रयोग आता अमेरिकेतही होत आहेत. त्यनिमित्ताने अमर....ची सगळी टीम अमेरिकेत पोहोचली आहे.

https://www.instagram.com/p/BvEu_GjAcu6/?utm_source=ig_web_copy_link

अमेरिकेच्या वेगवेगळ्या शहरात या नाटकांचे प्रयोग होत असून सगळ्याच प्रयोगांना रसिकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच प्रयोगांच्या दरम्यान वेळ काढून या नाटकाची टीम अमेरिकेत फेरफटका मारताना दिसत आहे. या नाटकात अमेय वाघ, सुव्रत जोशी, सिद्धेश पूरकर, पर्ण पेठे आणि पूजा ठोंबरे यांच्या भूमिका आहेत. या नाटकात यापुर्वी सखी गोखले हिची देखील भूमिका होती. पण तिने काही कारणास्तव हे नाटक सोडलं तिची जागा पर्ण पेठेने घेतली आहे.

 

Recommended

Share