By  
on  

सिनेसृष्टीतली ही जाधवांची जोडगोळी करतेय नव्या प्रोजेक्टवर काम

मराठी सिनेसृष्टीत अनेक नवनव्या विषयांवर सिनेमे प्रेक्षकांच्या भेटील येतात. नेहमीच रसिकांना वेगळ्या वाटेवरचे आणि अस्सल  मनोरंजनाने भरपूर सिनेमे देण्याकडे फिल्ममेकर्सचा कल असतो. 

आता लवकरच रसिकांना काहीतरी खास पाहायला मिळणार आहे, कारण सिनेसृष्टीतली ही जाधवांची जोडी एका आगामी प्रोजेक्टसाठी एकत्र आलीय. अभिनेता -दिगदर्शक लेखक प्रियदर्शन जाधव आणि अभिनेते-दिग्दर्शक निर्माते रवी जाधव ही जोडी एका आगामी प्रोजेक्टवर काम करतेय. ह्या भेटीदरम्यानचा फोटो नुकताच रवी जाधव यांनी इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे.

 

 

प्रियदर्शन जाधवने रवी जाधव यांच्या टाईमपास या सुपरहिट सिनेमाचं संवाद लेखन केलं होतं. तर टाईमपास -२ या सुपरहिट सिनेमाचा प्रियदर्शन नायक होता. आता पुन्हा एकदा ही जोडी नव्या प्रोजेक्टसाठी एकत्र येतेय म्हटल्यावर रसिकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive