By  
on  

Video : ‘माझी नवरी दिसतेस गं..’, लग्नसोहळ्यात कार्तिकीचा पतीसोबत रोमॅण्टीक अंदाज

‘सारेगमप लिटिल चॅम्प फेम प्रसिध्द गायिका कार्तिकी गायकवाड अलिकडेच रोनित पिसेसोबत लग्नबंधनात अडकली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर कार्तिकी आणि रोनितच्या शाही विवाह सोहळ्याची खुप चर्चा रंगली . लग्नानंतर कार्तिकीने सोशल मीडियावर या लग्नसोहळ्यातील काही फोटो शेअर केले आहेत. त्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. 

आता कार्तिकीने पुन्हा एकदा लग्नसोहळ्यातून  एक खास व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विशेष म्हणजे पारंपरिक नऊवारी साडी आणि दागिण्यांन्यांमध्ये नवराई कार्तिकीचं सौंदर्य  खुललं असून तिचा व्हिडीओ खुपच गाजतोय. 

“जरीच्या साडीत किती सजून-धजून..गुणाची दिसतेस गं,माझी नवरी दिसतेस गं..”या गाजलेल्या गाण्यावर कार्तिकीने व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये रोनित आणि कार्तिकीचा जबरदस्त रोमॅण्टिक अंदाज चाहत्यांना पाहायला मिळतोय.

 

 

लॉकडाऊन दरम्यान जुलै महिन्यामध्ये कार्तिकी आणि रोनितचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या जोडीने लग्नगाठ बांधली. लग्नानंतर कार्तिकीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो व व्हिडीओ शेअर करत ही गोड बातमी दिली होती. यामध्ये तिचा आणि रोनितचा एक व्हिडीओ चांगलाच चर्चिला जात आहे.सैराटच्या गाण्यांच्या धर्तीवरचा कार्तिकी आणि तिच्या  पतीचा हा व्हिडीओ चांगलाच गाजला. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive