कुठला नवीन अध्याय सुरु करतोय सुबोध भावे,पाहा फोटो

By  
on  

आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा सर्वांचा लाडका अभिनेता सुबोध भावे पुन्हा एकदा काहितरी  अप्रतिम कलाकृती प्रेक्षकांसमोर घेऊन येण्याच्या तयारीला लागला आहे आणि याची खासम खास झलक त्याने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आपल्या आगामी प्रोजेक्टच्या स्क्रिप्ट वाचनाचा एक रहस्यमयी फोटो सुबोधने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

महत्त्वाचं म्हणजे सुबोधने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत त्याच्या डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमाचा दिग्दर्शक अभिजीत देशपांडे आणि प्रसिध्द दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांनासुध्दा पाहायला मिळतंय आणखी एक महत्त्वाचा व्यक्ती चुकवून कसं चालेल. सुबोध साकारत असलेला मि.विक्रांत सरंजामे आणि त्याच्या मागे सावलीसारखे फिरणारे मि. झेंडेसुध्दा या फोटोत दिसतायत. सुबोधने या फोटोला  "एका नवीन अध्यायाची सुरवात....लवकरच" त्यामुळे हे नाटकं असावं असा अंदाज सध्यातरी व्यक्त होतोय, पण नेमकी कोणती कलाकृती असणार हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

https://www.instagram.com/p/BvM2UV2lkgd/

Recommended

Share