'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतला कोल्हापूरचा रांगडा गडी राणा दा साकारुन अभिनेता हार्दिक जोशी महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहचला. त्याने प्रेक्षकांच्या मनात आपल्या सहज-सुंदर अभिनयाने एक खास स्थान निर्माण केलं आहे. मालिकेतली त्याची आणि अंजलीबाई साकारणा-या अभिनेत्री अक्षया देवधरची केमिस्ट्री तर रसिकांना खुपच भावते.
हार्दिक जोशी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतो. अनेक हटके पोस्टमधून तो चाहत्यांचं लक्ष वेधतो. अलिकडेच राणादा सोशल मिडीयावर त्याचे जबरदस्त स्टायलिश फोटो चाहत्यांशी शेअर करतोय.
स्टायलिश आऊटफिटमध्ये राणादाचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळतोय.
रांगडा पहलवान राणदा आणि त्याची स्टाईल सगळ्यांना आवडते. या मालिकेच्या निमित्ताने राणादा या पात्रा व्यतिरिक्त राजा राजगोंडा आणि आणखी विविधं पात्र अभिनेता हार्दिक जोशीने साकारली आहेत.
सोशल मिडीयावर राणादा फेम हार्दिक जोशीचा खुप मोठा चाहता वर्ग आहे
हार्दिक जोशीच्या या स्टायलिश फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षा केला आहे.
'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका गेली दोन-तीन वर्ष रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनली आहे. अनेक नवनवी वळणं घेत ही मालिका रसिकांचं मनोरंजन करतेय.