मराठी बिग बॉस पर्व २ चा थरार यावेळी रंगणार मुंबईमध्ये, जाणून घ्या काय आहे कारण

By  
on  

हिंदी बिग बॉसच्या धर्तीवर मराठी बिग बॉस सुरु झालं आणि बघता बघता शोने रसिकांच्या पसंतीची पावती मिळवली. मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाने रसिकांच्या मनात जागा निर्माण केलीच शिवाय पुढील पर्वाची उत्सुकताही वाढवली. कलर्स मराठीच्या ट्वीटर अकाउंट्वरुन दुस-या पर्वाची नांदी नुकतीच केली गेली. पण या पर्वाच्याबाबत एक बाब वेगळी असणार आहे, ती म्हणजे या शोच्या सेटचं लोकेशन.

मागील पर्वाचा सेट लोणावळा इथं उभारला होता. पण आता कलाकारांच्या सोयीसाठी आताचा सेट मुंबई येथे उभारला जाणार आहे. याशिवाय दुस-या पर्वात कोणकोणते कलाकार असणार आहेत याचीदेखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. यावेळच्या पर्वात शैलेश दातार, अक्षया गुरव, वीणा जगताप, अर्चना निपणकर, गौतम जोगळेकर हे ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेतील कलाकार दिसणार असं बोललं जात आहे. राधा प्रेम रंगी रंगली’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून तिची जागा नवी मलिका घेणार आहे.

Recommended

Share