माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांनी घरी आणला हा नवा सदस्य

By  
on  

आपल्या सहज सुंदर अभिनयाने अवघ्या मनोरंजन विश्वाला वेड लावणारी सौंदर्यसम्राज्ञी अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी नुकताच एक स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. नेने कुटुबियांनी नुकतंच एका छोट्या पप्पी डॉगला म्हणजेच कुत्र्याच्या गोड पिल्लाला दत्तक घेतलं आहे आणि लगेचच घरातील या सदस्याचं नाव 'कार्मेलो नेने' असं ठेवलं आहे.

माधुरी आणि तिचे पती श्रीराम नेने यांनी या छोट्या पपीला दत्तक घेतल्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलांसह संपूर्ण कुटुंबियांचा आनंद या नव्या सदस्याच्या आगमनामुळे ओसंडून वाहत होता. तसंच हे फोटो शेअर करत माधुरीने सर्व प्राणीमित्रांना 'पाळीव प्राणी दत्तक घ्या आणि मग बघा तुमचं संपूर्ण आयुष्य कसं आनंदाने न्हाहून निघतं ते,' असं आवाहन केलं आहे.

डॉ. श्रीराम नेने यांनी मुलगा व कार्मेलो नेनेसह काढलेला बॉचवरील गोड सेल्फी

https://twitter.com/MadhuriDixit/status/1108291246823342080

Recommended

Loading...
Share