इशावर चढलाय विक्रांतच्या कारस्थानाचा रंग, इशा कशी वाचणार त्यातून?

By  
on  

सध्या सगळीकडे होळीचा रंगीबेरंगी माहोल आहे. या वातावरणापासून मालिकांचं जग कसं बरं लांब असेल? सध्या मालिकांमधूनही होळीच्या रंगांची उधळण होताना दिसत आहे. प्रेक्षकांच्या मनात खास जागा असलेल्या तुला पाहते रे या मालिकेतही होळीचे रंग दिसून येत आहे. विशेष म्हणजे इशाला रंग लावलेला अजिबात आवडत नाही, असं ती सगळ्यांना सांगत असतानाच विक्रांत तिला रंग लावतो. अशा वेळी इशाची काय प्रतिक्रिया असेल हे पाहण्याची उत्सुकता रसिकांना असेलच.

https://twitter.com/zeemarathi/status/1107968741424283648

यावेळी निमकरांनी सरंजामे कुटुंबियांना होळीनिमित्त घरी येण्याचं आमंत्रण दिलं आहे. यावेळी इशा आणि विक्रांतवर होळीसोबतच प्रेमाचा रंगही चढलेला दिसत आहे. पण यामागे प्रेम आहे की विक्रांतचं कारस्थान हे जाणून घेण्यासाठी मात्र ‘तुला पाहते रे’ चा होळी स्पेशल एपिसोड पहायलाच हवा.

https://twitter.com/zeemarathi/status/1108269493137096705

 

Recommended

Loading...
Share