By  
on  

Worlds Saree day: अभिनेता भरत जाधवने शेअर केली त्यांची साडी प्रेमाची आठवण

आज जागतिक साडी दिवस आहे. या दिवसानिमित्त ग्रेसफुल भारतीय वेशभुषेची ओळख असलेल्या साडीचे फोटो अनेक सेलिब्रिटी शेअर करत आहेत. अभिनेता भरत जाधव यांनीही खास आठवण शेअर केली आहे. भरत आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, महिलांना तयारी करण्यास नेहमी वेळ लागतो, अशी तक्रार असते.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

 

महिला नटून तयार होण्यासाठी फार वेळ लावतात, असा आरोपही त्यांच्यावर होतो. पण तो काय त्रास असतो हे मोरुची मावशी करताना अनुभवलं. अनेकदा प्रयोगानंतर महिला विचारायच्या की तुम्हाला साडी घालून तयार व्हायला किती वेळ लागतो..?
मी ७ मिनिटात तयार व्ह्यायचो. अर्थात मला तयार करायला सोबत वेगळी माणसं असायची. ज्यांनी मावशीची भूमिका अजरामर केली त्या विजय चव्हाण यांनी मला खूप टिप्स दिल्या. साडी कशी नेसायची, निऱ्या कशा बांधायच्या आणि साडी मध्येच सुटू नये म्हणून काय काळजी घ्यायची.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive