By  
on  

कडाक्याच्या थंडीत ह्या मराठी अभिनेत्रीने शेअर केला तिचा बिकीनी अवतार

आजकाल सोशल मिडीयाच्या माध्यमामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देण्साठी सेलिब्रिटी नेहमीच पुढाकार घेतात. त्यांच्या नवनव्या पोस्टवर चाहते कौतुकाचा वर्षाव करतात. काही ना कही सतत हटके पोस्ट ते चाहत्यांपर्यंत पोहचवतात. पण नुकतीच  या मराठी अभिनेत्री अलिकडेच केलेली ही पोस्ट पाहून तुम्ही मात्र अवाक् व्हाल एवढं मात्र नक्की. 

फ्रेशर्स, मी तुझीच रे यांसारख्या मालिकांमधून चाहत्यांच्या भेटीला आलेलीअभिनेत्री अमृता देशमुख ही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. अनेक नानाविविध फोटोशूट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. पण अमृताने आत्ता केलेली पोस्ट पाहून मात्र तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. अमृताने चक्क हॉट बिकीनीतला फोटो शेअर केलाय. समुद्रकिना-यावर गडद आकाशी रंगाच्या या बिकीनीतला हा अमृताचा फोटो कडाक्याच्या थंडीतसुध्दा तापमानाचा पारा वाढवतोय. चाहत्यांना तिचं ट्रान्सफॉर्मेशन प्रचंड आवडलं असून त्यांनी या फोटोवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केलाय. 

 

 

अमृताचा स्वीटी सातारकर हा भन्नाट कॉमेडी सिनेमासुध्दा मागच्या वर्षी प्रदर्शित झाला होता. आता ती आगामी कोणत्या प्रोजेक्टमध्ये झळकते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive