By  
on  

‘खुलता कळी खुलेना’च्या टीमच्या रियुनियनमध्ये दिसला मयुरी देशमुखचा हटके अंदाज

काहीसं हटके कथानक असलेली मालिका खुलता कळी खुलेना प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मोनिका - विक्रांत आणि मानसी या तीन व्यक्तिरेखांभोवती मालिकेचे कथानक फिरत होतं. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवलं होती.  या मालिकेतील कलाकारांचं फॅन फॉलोविंगही त्यामुळे वाढलं होतं. या मालिकेतील कलाकारांचं नुकतंच रियुनियन पाहायला मिळालं. अभिज्ञा भावेने या रियुनियनचे फोटो शेअर केले आहेत. 

 

 

यावेळी फोटोमध्ये ओमप्रकाश शिंदे, अभिज्ञा भावे, शर्वरी लोहोकरे, मयुरी देशमुख, सागर मोरे दिसत आहे. अभिनेत्री मयुरी देशमुखही यावेळी दिसून आली. मयुरीच्या दिलखुलास हास्याने चाहत्यांची मनं जिंकून घेतली.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive