By  
on  

जिंदगी का सफर अब तेरे साथ में! कार्तिकी गायकवाडच्या वेडिंगचा शिनमा पाहिलात का?

‘सारेगमप लिटिल चॅम्प’चे विजेतेपद पटकावणारी गायिका कार्तिकी गायकवाड लग्नबंधनात अडकली आहे. व्यावसायिक रोनित पिसेशी कार्तिकीचा विवाह संपन्न झाला. अनलॉकमध्ये जुलै महिन्यात कार्तिकीचा साखरपुडा पार पडला. त्यावेळच्या तिच्या  फोटोंची आणि व्हिडीओंची बरीच चर्चा रंगली होती.तशीत तिच्या या शाहीविवाहसोहळ्याचीसुध्दा रंगली. पण त्याहीपेक्षा कार्तिकी आणि पती रोनितचा वेडींगचा हा रोमॅण्टिक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान हिट ठरतोय. 

महत्त्वाचं म्हणजे या व्हिडीओत बॅंकग्राऊंडला जिंदगी का सफर अब तेरे साथ में! हे सुंदर गाणं ऐकू येतंय.हे गाणं स्वत: कार्तिकीने गायलंय. तर तिचा भाऊ कौस्तुभ गायकवाडने यात तिला सुरेल साथ दिली आहे. हे गीत त्यानेच लिहून संगीतबध्दसुध्दा केलं आहे. ह्या व्हिडीओत कार्तिकीच्या लग्नसोहळ्याचे अनेक क्षण पाहायलासुध्दा मिळतायत. तिचे चाहते महाराष्ट्रात सर्वदूर पसरले आहेत. त्यांनी या व्हिडीओवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा अक्षरश: पाऊस पाडायला सुरुवात केलीय. 

 

 

 

आपल्या खणखणीत आवाजाने  वेड लावणारी गाणी गाऊन कार्तिकी गायकवाडने रसिक प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केलं आहे. कार्तिकिचा पती रोनित पिसे हा पुण्याचा राहणारा असून इंजिनीअर आहे. विशेष म्हणजे रोनितलाही संगीताची आवड आहे. तो उत्तम तबलावादक आहे. गायकवाड कुटुंब आळंदीत राहत असून कार्तिकी आपले वडील आणि गुरू कल्याणजी गायकवाड यांच्या संगीताचा वारसा चालवते.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive