कॉमेडी एक्सप्रेसमधून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री नम्रता संभेरावच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. नम्रताने योगेश संभेराव याच्यासोबत विवाह केला आहे. अलीकडेच तिचं डोहाळेजेवण अर्थात बेबीशॉवर पार पडलं होतं. 16 मार्च रोजी तिनं एका गोंडस चिमुकल्याला जन्म दिला आहे. ही आनंदवार्ता नम्रताने आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन सर्वांना दिली आणि संपूर्ण सिनेसृष्टी आणि मित्र-परिवाराकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे.
https://www.facebook.com/photo.php?fbid=2655536557795398&set=a.232636113418800&type=3&theater
आपल्या परफेक्ट विनोदी टाईमिंगमुळे नम्रताने अल्पावधीतच छोट्या पडद्यावर स्थान मिळवलं आहे. छोट्या आणि मोठ्या पडद्यासोबतच रंगभूमीवरही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.