By  
on  

सौरभ गोखले साकारणार सैनिकाची व्यक्तिरेखा? सैन्याच्या गणवेशातील फोटो केला शेअर

पुलवामा हल्ल्यामुळे सध्या प्रत्येक भारतीयाच्या मनात सीमेवरील सैनिकाविषयी असलेल्या आदरामध्ये वाढ झाली आहे. सीमेवर देशाची बाजी लावणा-या सैनिकाच्या संघर्षाच्या कथा पडद्यावर आणण्यामध्ये दिग्दर्शकही कुठे कमी नाही. अभिनेता सौरभ गोखलेनेही अलीकडेच सोशल मिडियावर सैन्याचा वेषातील फोटो शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/BvLTPScj2NC/?utm_source=ig_web_copy_link

यावरून सौरभ त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये सैनिकाचा रोल करणार आहे हे लक्षात येत आहे. हा युनिफॉर्म वेगळीच ऊर्जा निर्माण करतो असं कॅप्शन सौरभने या फोटोला दिलं आहे. या फोटोला लाईक्स मिळत आहेत. सौरभ नक्की मालिकेत ही व्यक्तिरेखा साकारत आहे की सिनेमात हे तर त्याने सांगितलं नाही. तोपर्यंत प्रेक्षकांनी वाट पाहायला हवी. सौरभ अलीकडेच रोहित शेट्टीच्या सिंबामध्ये दिसला होता.

 

Recommended

PeepingMoon Exclusive