By  
on  

अमेय वाघला मिळाली नवी मैत्रिण, सोशल मिडियावर शेअर केला एकत्र फोटो

अमेय हा अत्यंत हरहुन्नरी कलाकार आहे. त्याने नाटक, मालिका, सिनेमा, वेबसिरीज अशा प्रत्येक प्रकारात अभिनयाची छाप उमटवली आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’मधून रसिकांच्यासमोर आलेल्या अमेयने आज स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या अमेय ‘अमर फोटो स्टुडियो’च्या दौ-यानिमित्ताने अमेरिकेत आहे. अमेय बोस्टनला गेला असताना त्याला एक नवी मैत्रिण मिळाली आहे. या मैत्रिणीसोबतचा फोटोही त्याने सोशल मिडियावर शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/BvQSA_6hxLO/?utm_source=ig_web_copy_link

ही मैत्रिण दुसरी तिसरी कोणी नसून एक गोंडस कुत्री आहे. हा फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनही मजेदार दिलं आहे. तो म्हणतो, ‘तिला कळलंय हा वाघ harmless आहे आणि मला पण कळलं ती खूप प्रेमळ आहे! भेटा बोस्टनमधील माझ्या नव्या मैत्रिणीला...’ अमर फोटो स्टुडियो हे तरुणाईचं नाटक असलं तरी प्रत्येकाला आवडत आहे. या नाटकात अमेय वाघ, सुव्रत जोशी, सिद्धेश पूरकर, पर्ण पेठे आणि पूजा ठोंबरे यांच्या भूमिका आहेत. या नाटकात यापुर्वी सखी गोखले हिची देखील भूमिका होती. पण तिने काही कारणास्तव हे नाटक सोडलं तिची जागा पर्ण पेठेने घेतली आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive