By  
on  

सिद्धार्थ जाधव बनला ‘संडे स्पेशल शेफ’, बनवली ही खास डिश

मराठी सिनेसृष्टीतील ‘एनर्जी मॅन’ म्हणून ओळखला जाणारा कलाकार म्हणजे सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थ पडद्यावर अत्यंत अ‍ॅक्टीव्ह असतोच, पण तो एक परफेक्ट फॅमिली मॅनही आहे. सिद्धार्थने सोशल मिडियावर अलीकडेच एक व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोत तो स्वयंपाकघरात काहीतरी उलाढाल करताना दिसत आहे. ही उलाढाल आहे मुळ्याची भाजीची. सिद्धार्थने एका रविवारी पत्नीला मदत म्हणून मुळ्याची भाजी करण्याची ठरवलं.

https://www.instagram.com/p/BvbNZttAOnz/?utm_source=ig_web_copy_link

हा भाजी करतानाचा व्हिडियो शेअर करताना त्याने गप्पाही मारल्या आहेत. या व्हिडियोत सिद्धार्थ म्हणतो, ‘आज मी या स्वयंपाकघरात कामगार आहे तर माझी बायको मुकादम आहे. तिच्या मार्गदर्शनाखाली ही भाजी मी करत आहे’. एकंदरीत ही भाजी कशी झाली होती हे समजलं नसलं तरी या व्हिडियोवर लाईक्सचा पाऊस मात्र पडला.

Recommended

PeepingMoon Exclusive