By  
on  

सोनाली कुलकर्णीचा आगामी सिनेमा असणार ऐतिहासिक सिनेमा?

मराठी सिनेसृष्टीमधील आघाडीचं नाव म्हणजे सोनाली कुलकर्णी. नटरंग सिनेमातून प्रसिद्धीस आलेल्या सोनालीने रसिकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. सोनाली अभिनयाप्रमाणेच नृत्यातही पारंगत आहे. मराठी सिनेमांविषयी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सोनाली म्हणते, सिनेमा म्हणजे केवळ झगमगाट नाही तर कथा रसिकांपर्यंत पोहोचवण्याची अत्यंत योग्य पद्धत आहे. मराठी सिनेसृष्टीमध्ये दर्जा आधारित सिनेमे बनत आहेत ही समाधानाची बाब आहे. या सोबतच सोनालीने तिच्या आगामी सिनेमाविषयीही सांगितलं. ती म्हणते, मी माझ्या पहिल्या ऐतिहासिक सिनेमासाठी खुप उत्साहित आहे. बायोपिकच्या जवळ जाणा-या या सिनेमात काम करताना खुपच आनंद होत आहे. मराठी सिनेसृष्टीचा भाग असल्याचा कायमच अभिमान वाटतो.’ सोनाली नुकतीच ‘ती अ‍ॅण्ड ती’ सिनेमातून रसिकांसमोर आली होती. आता तिला ऐतिहासिक व्यक्तिरेखेत पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता असेल यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive