By  
on  

मी मराठी असल्याचा सार्थ अभिमान आहे मला : प्राजक्ता माळी

जुळून येती रेशीमगाठी मालिकेमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द झालं. आपल्या सहज-सुंदर अभिनयाने प्राजक्ता रसिकांची मनं जिंकते. सिनेमांमधूनही प्राजक्ताने रसिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या धम्माल विनोदी शोच्या बहारदार सूत्रसंचलनाची जबाबदारी प्राजक्ता लिलया पार पाडतेय. 

प्राजक्ता सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. विविध फोटो, व्हिडीओ पोस्ट करत ती चाहत्यांशी कनेक्ट राहते. नुकतंच प्राजक्ताने तिचा मराठमोळ्या लुकमधला एक अप्रतिम फोटो शेअर केला आहे. या सुरेख पैठणी साडीत प्राजक्ताच्या सौंदर्यांला चार चॉंद लागले आहेत. 

 

 

महत्त्वाचं म्हणजे या फोटोसोबत प्राजक्ताने मी मराठी, सार्थ अभिमान आहे मला असा हॅशटॅग वापरला आहे. त्यामुळे चाहतावर्ग प्रचंड खुश झाला असून त्यांनी तिच्या या फोटोशूटवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करायला सुरुवात केलीय.  

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive