By  
on  

या मराठी अभिनेत्रीने साखरपुड्याच्या बातमीनंतर शेअर केला हा व्हिडीओ

माझ्या नव-याची बायको मालिका गेली कित्येक वर्ष रसिकांचं भरपूर मनोरंजन करतेय. अनेक उत्कंठाव्धक ट्विस्ट घेऊन ही मालिका प्रेक्षकांसमोर सतत येत असते आमि त्यांच्या पसंतीस उतरते. या मालिकेतली सर्वच पात्र लोकप्रिय आहेत. या मालिकेत गुरुनाथला मायाजालात ओढणारी अभिनेत्री रुचिरा जाधवनेसुध्दा  अल्पावधितच रसिकांची मनं जिंकली. रुचिरा सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. बोल्ड आणि ब्युटिफुल लुकमुळे ती चाहत्यांची मनं जिंकते. सतत व्हिडीओ व फोटोंच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. पण रुचिरा सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे आणि ते म्हणजे तिच्या साखरपुड्याच्या बातमीने. पण तथ्य काय आहे, रुचिरानेच तिच्या सोशल मिडीयावर नुकताच एक व्हिडीओ शेअर करत सांगितलं आहे. 

दोन दिवसांपूर्वीच रुचिराने साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते. यानंतर तिच्यावर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला होता.अनेक माध्यमांतून तिच्या साखरपुड्याची बातमीसुध्दा छापून आली होती, पण खरं म्हणजे रुचिराचा नाही तर तिच्या मोठा बहिणीचा ऋतुजा जाधवचा साखरपुडा संपन्न झाला. तिने आपल्या पोस्टमध्ये या दोघांना मेन्शनही केलं होतं. पण रुचिरा व तिची मोठी बहिण या दोघींमध्ये बरंच साम्य असल्याने अनेकांची गफलत झाली आणि सर्वांनी रुचिराचाच साखरपुडा झाल्याचं जाहीर केलं. या गोंधळानंतर अखेरीस रुचिराला एक व्हिडीओ प्रदर्शित करुन...मला अजून वेळ आहे, असंच सर्वांना सांगावं लागलं. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ruchira Jadhav (@ruchira_rj)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive