रोहीत राऊत खुप लहान वयापासून संगीत क्षेत्राशी जोडला गेलेला आहे. रोहीतने आतापर्यंत दुनियारी’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘कान्हा’, ‘फुंतरु, ‘वन वे तिकिट, ‘बे दुणे साडेचार’ या सिनेमांसाठी पार्श्वगायन केलं आहे. ‘सारेगाममापा’ या रिअॅलिटी शो मधून रोहीत राऊत या हि-याची ओळख झाली. अल्पावधीतच रोहीतच्या आवाजाची मोहिनी प्रत्येकावर पडली. इतके दिवस पार्श्वगायक असलेल्या रोहीतची ‘मोगरा फुलला’ या सिनेमापासून ओळख मात्र बदलली आहे.
https://www.instagram.com/p/Bu725yzgoVU/?utm_source=ig_web_copy_link
रोहीत या सिनेमाच्या संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. रोहित पहिल्यांदाच संगीत दिग्दर्शकाच्या भूमिकेत रसिकांच्या समोर येत आहे. त्यामुळे त्याच्या या नव्या इनिंगबाबत रसिकांमध्ये उत्सुकता आहे. श्रावणी देवधर दिग्दर्शित आणि ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट अँड मिडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या (जीसिम्स)च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार निर्मित स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट ‘मोगरा फुलला’ १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
https://www.instagram.com/p/Bu3NXlyga4a/?utm_source=ig_web_copy_link