By  
on  

स्मिता तांबेच्या घरी लाडाची लेक मिताली आणि सिध्दार्थसाठी केळवणाचा थाट

यंदा कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकतायत. त्यांची लगीनघाई सुरु आहे. प्रसिध्द सेलिब्रिटी कपल सिध्दार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर लवकरच बोहल्यावर चढणार आहेत. म्हणूनच त्यांच्यासाठी खास सिनेविश्वातील त्यांच्या सहकलाकार मित्र-मंडळींकडून केळवणाचं आयोजन करण्यात येत आहे. याचे फोटो सोशल मिडयावर सध्या पाहायला मिळतायत. नुकतंच लाडाची मी लेक गं या झी मराठीवरील मालिकेतील मम्मी म्हणजेच स्मिता तांबेने आपल्या ऑनस्क्रीन सुनेला म्हणजेच अभिनेत्री मिताली मयेकर व अभिनेता सिध्दार्थ चांदेकर यांना घरी खास केळवणासाठी निमंत्रित केलं होतं. 

 

स्मिताचे पती आणि तिच्या संपूर्ण कुटुंबियांनी सिध्दार्थ-मितालीचं अगदी शानदार आदरतिथ्य केलं. स्मिताच्या या आदरतिथ्याने भारावलेली मिताली ह्याय केळवण कार्यक्रमाचे सुरेख फोटो पोस्ट करत  म्हणते, 'खरंच लाडाची लेक असल्यासारखं वाटलं'.

 

 

 

लग्नाआधी वधू-वरांसाठी केलं जाणारं केळवण हे तर सगळ्यांनी एकत्र भेटण्याचं निमित्त असतं. वधू-वरांच्या आवडीचे पदार्थ करून जेवणासाठी आमंत्रित केलं जातं. त्यानंतर एखादी भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या जातात. 

२०१९ मध्ये सिद्धार्थ-मितालीचा साखरपुडा पार पडला. गेल्या तीन वर्षांपासून हे दोघं एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये आहेत. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive