गायत्री दातारची नवी इनिंग, चमकणार ‘कोल्हापूर डायरी’ सिनेमात

By  
on  

‘तुला पाहते रे’ फेम इशा अर्थात गायत्री दातार हिच्य समोर थेट सिनेमात काम करण्याची संधी चालून आली आहे. गायत्री आगामी ‘कोल्हापूर डायरी’ सिनेमात झळकणार आहे. गायत्रीला ‘तुला पाहते रे’ या मालिकेतील इशाच्या भूमिकेमुळे प्रसिद्धी मिळाली आहे. या सिनेमात गायत्री एका कोल्हापूरी मुलीच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे.

गायक-संगीतकार अवधूत गुप्ते आणि निर्माते वजीर सिंग यांनी ‘कोल्हापूर डायरी’ या सिनेमाच्या निर्मितीची धुरा एकत्रितरित्या सांभाळली आहे. अनेक पुरस्कारांचा मानकरी ठरलेल्या सुपरहिट मल्याळम सिनेमा ‘अंगमलइ डायरीज’चा ‘कोल्हापूर डायरी’ हा रिमेक आहे. एका शहराच्या प्रवास वर्णनावर हा सिनेमा आधारित असल्याचे समजतं. जो राजन या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. भूषण नानासाहेब पाटील हा अभिनेता कोल्हापूर डायरीज या सिनेमात प्रमूख भूमिकेत झळकतोय. या सिनेमाविषयी गायत्री खुपच उत्सुक आहे.

Recommended

Loading...
Share