'माझे बाबा ह्यात नाहीत, पण.. ' डॉक्टर डॉनच्या अभिनेत्रीचा हदयस्पर्शी किस्सा

By  
on  

अभिनेता देवदत्त नागे, अभिनेत्री श्वेता शिंदे आणि रोहिणी हट्टंगडी अशा दिग्गज कलाकारांचे ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन झाले. ही मालिका अल्पावधितच लोकप्रिय झाली. देवाभाई आणि डॉलीबाईंची ही हटके लव्हस्टोरी सर्वांनाच भावली. डॉक्टर डॉनचे पंटर, डॉलीबाईंची शिस्त ही सर्व धम्माल छोट्या पडद्यावर अनुभवणं आनंददायी ठरते. 

या मालिकेची अजून एक बाजू म्हणजे यातील वडील-मुलीचं दाखवलेलं नातं. वडिलांचं मुलीवर असलेलं प्रेम आणि त्यासाठी काहीही करण्याची असलेली त्यांची तयारी. यातील राधा आणि देवा ही बापलेकीची जोडी देखील प्रेक्षकांना खूप आवडतेय. नुकतंच राधाची भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्री प्रज्ञा चवंडे हिने सोशल मीडियावर तिचा आणि देवाचा मालिकेतील एका फोटो शेअर करत भावनिक पोस्ट शेअर केली. देवाची भूमिका साकारणा-या देवदत्त नागेसाटी ही पोस्ट तिने केलीय. 

 

प्रज्ञा पोस्टमध्ये म्हणते, “वडील आणि मुलीचं प्रेमाचं नातं हे अद्भुत असतं. आम्ही जरी पडद्यावर वडील आणि मुलीची भूमिका साकारत असलो तरी खऱ्या आयुष्यात देखील ते मला वडिलांच्या जागीच आहेत. माझे बाबा हयात नाहीत म्हणून मी बाबा म्हणणं खूप मिस करत होते. पण देवदत्त नागे यांच्या रूपात मला बाबा हा सुंदर शब्द पुन्हा एकदा बोलण्याची संधी दिली. मी त्यांना सेटवर या आधी सर म्हणत होते पण एक दिवस त्यांनी मला स्वतःहून त्यांना बाबा म्हणून हाक मारायला सांगितली. यापेक्षा जास्त अजून मी काहीच व्यक्त होऊ शकत नाही. मी भारावले आहे” असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे

 

Recommended

Loading...
Share