आदिनाथ कोठारेने आजवर मालिका आणि सिनेमामधून अभिनयाची झलक दाखवली आहे. पण आता आदिनाथला एक उत्तम संधी चालून आली आहे. आदिनाथ आगामी ‘83’ मध्ये दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातून आदिनाथ बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. खरं तर दिलीप वेंगसरकर हे अंतिम सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकले नव्हते. पण संघाच्या एकुणच विजयात त्यांचा वाटा मोलाचा आहे. या अनुभवाबद्दल आदिनाथ म्हणतो, मला या सिनेमाच्या ऑडिशनसाठी विचारणा झाली होती. मी ऑडिशनला गेलो, त्यानंतर दिलीप यांच्यासारखं वागण्या बोलण्याची लय पकडायला मला १५ मिनिटं दिली. त्यानंतर मी ऑडिशन दिली त्यांना ती पसंत पडली. त्यावेळेचा माझा आनंद अवर्णनीय होता.’
https://twitter.com/adinathkothare/status/1111852306868379648
’83’ या सिनेमात भारतीय क्रिकेट संघाचा पहिला विश्वचषक जिंकण्यापर्यंतचा प्रवास दाखवला जात आहे. १९८३ मध्ये भारताने पहिल्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. या सिनेमात कपिलदेवची भूमिका रणवीर सिंग साकारणार आहे. यात कृष्णम्माचारी श्रीकांत यांची व्यक्तिरेखा दाक्षिणात्य अभिनेता जीवा साकारणार आहे. विकेटकीपर सय्यद किरमानी यांची व्यक्तिरेखा युट्युब स्टार साहिल खट्टर साकारणार आहे. तर संजय पाटील यांची व्यक्तिरेखा चिराग पाटील साकारणार आहेत