दिग्दर्शक निपुण धर्माधिकारीला कन्यारत्नाचा लाभ, शेअर केला हा गोड फोटो

By  
on  

अभिनेता, लेखक, दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी याला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सुरेख भेट मिळाली आहे. निपुण आणि पत्नी संचिता यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. निपुणने पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. ‘पाच वर्ष आणि एका व्यक्तीनंतर......’  असं कॅप्शन देत निपुणने लेकीचा गोड फोटो शेअर केला आहे.

 

 

निपुण अलीकडेच नेटफ्लिक्सच्या ‘मिसमॅच’ या सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिरीजच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निपुणने पेलली होती. निपुणवर अमेय वाघ, राहुल देशपांडे, सायली संजीव, सुयश टिळक, सुव्रत जोशी, जितेंद्र जोशी अमृता खानविलकर, मृण्मयी गोडबोले या कलाकारांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Recommended

Loading...
Share