By  
on  

जीव जाईपर्यंतच्या ‘पर्मनंट लव्ह’ची गोष्ट सांगणारा 'कागर'चा टीजर रिलीज

रिंकू राजगुरु हे नाव परिचित नाही अशी व्यक्ती अभावानेच आढळेल. ‘सैराट’च्या दमदार यशाची चव चाखलेल्या रिंकूचा आणखी एक सिनेमा प्रदर्शनाला सिद्ध झाला आहे. आता जवळपास ‘सैराट’च्या दोन वर्षांनतर रिंकू पुरागमनासाठी सज्ज झाली. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक विजू माने  यांच्या ‘कागर’ या सिनेमामधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा टीजर नुकताच रिलीज झाला आहे. यात रिंकूचा पुर्णपणे वेगळा लूक दिसून येत आहे. या टीजरमध्ये रिंकूची दोन रुपं दिसून येत आहेत. पहिल्यात ती हळवी प्रेमिका दिसते तर टीजरच्या शेवटाला जाताना रिंकू राजकारणी लूकमध्ये दिसते. एकुणच या सिनेमाने प्रेक्षकांची उत्कंठा वाढीस लागेल यात शंका नाही. सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या ‘उदाहरणार्थ’ या संस्थेने सिनेमाची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी कागरचं दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा २६ एप्रिल २०१९ रोजी रिलीज होणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=jTAovPpzKJw

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive