By  
on  

‘मराठी बिग बॉस २’चे स्पर्धक माहीत करून घ्यायचे आहेत? मग सोडवा हे कोडं

यशस्वी रिअ‍ॅलिटी शोच्या यादीत मराठी बिग बॉसचा नंबर सगळ्यात वर आहे. या शोने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. या आगामी पर्वात कोण कोण स्पर्धक असणार याची उत्सुकता रसिकांच्या मनात वाढू लागली आहे.

https://twitter.com/ColorsMarathi/status/1112540801299632129

प्रेक्षकांची उत्सुकता पाहता कलर्स मराठीने एक ट्वीट करत स्पर्धकांच्या नावाच्या आद्याक्षराची कोड्यासारखी मांडणी केली होती. आणि प्रेक्षकांना ओळखायला लावलं होतं. या कोड्यात वै, आ, सु, चि, अ, प्रा ही अ‍क्षरं आहेत. यावरून प्रेक्षकांनी वैदेही, अक्षया गुरव, सुव्रत जोशी, चिन्मय मांडलेकर, अभिनय बेर्डे, सुयश टिळक यांच्या नावाचा अंदाज रसिकांनी लावला आहे. आता यापैकी कोणकोणती नावं खरी ठरतात ते लवकरच समजेल.

Recommended

PeepingMoon Exclusive