‘टाईमपास 3’ मध्ये लागली या अभिनेत्रीची वर्णी?

By  
on  

‘टाईमपास’ मधील दगडू-प्राजू आठवतात का तुम्हाला? या सिनेमाने एक वेगळाच रोमॅंटिक एरा निर्माण केला आहे. दगडू-प्राजूचं निरागस अल्लड प्रेम आणि केमिस्ट्रीने प्रेक्षकांचं मन जिंकलं. त्यानंतर आलेल्या ‘टाईमपास 2’ नेही स्वत:चा असा खास प्रेक्षकवर्ग निर्माण केला. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hruta (@hruta12)

 

पण नुकतीच ‘टाईमपास 3’ ची चर्चा सुरु झाली आहे. काही दिवसांपुर्वी रवी जाधव यांच्या बदाम तिर्रीने प्रेक्षकांच्या उत्सुकेत भर घातली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार अभिनेत्री ऋता दुर्गुळे या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय ऋता रवी जाधव दिग्दर्शित ‘अनन्या’ सिनेमातही झळकणार आहे. आता ऋता कशाप्रकारे प्राजू साकारते हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतील यात शंका नाही.’

Recommended

Loading...
Share