By  
on  

विक्रम फडणीस यांच्या 'स्माईल प्लीज'ची रिलीज डेट जाहीर, या दिवशी होणार रिलीज

फॅशन डिझायनर, दिग्दर्शक विक्रम फडणीस यांचा स्माईल प्लीज सिनेमाच्या रिलीजची तारीख समोर आली आहे. हा सिनेमा १९ जुलै २०१९ला रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या मुहुर्तापासूनच रसिकांना या सिनेमाविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.

https://www.instagram.com/p/Bv0v_UuAeep/?utm_source=ig_web_copy_link

या सिनेमात ललित प्रभाकर, मुक्ता बर्वे, प्रसाद ओक हे कलाकार दिसणार आहेत. याशिवाय आदिती गोवित्रिकरही या सिनेमात विशेष भूमिकेत आहे. या सिनेमाच्या मुहुर्ताला बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीच्या कलाकारांनी उपस्थिती लावली. विशेष उपस्थिती होती ती अभिनेता हृतिक रोशनची. ‘स्माईल प्लीज’ हा विक्रम यांचा दुसरा मराठी सिनेमा आहे. त्यापूर्वी त्यांनी ‘हृदयांतर’ या सिनेमाच्या निर्मिती आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. मध्यंतरी या सिनेमातील होळी सेलिब्रेशनचे फोटो समोर आले होते. विक्रम यांनी सोशल मिडियावर या सिनेमाचा फोटो शेअर करत ही माहिती दिली. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये विक्रम म्हणतात, ‘या सिनेमाची गोष्ट जगासोबत शेअर करायला मी खुप आतुर आहे.’ याशिवाय त्यांनी टीमचे आभार मानले आहेत.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive