सिध्दार्थ -मितालीनंतर सिनेसृष्टीतली ही प्रसिध्द जोडी अडकणार विवाहबंधनात

By  
on  

मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु आहे. एकापाठोपाठ  एक प्रसिद्द जोड्या लग्नबंधनात अडकतायत. अभिज्ञा भावे-मेहूल पै  आणि आता सिध्दार्थ-मिताली या प्रसिध्द सेलिब्रिटींनंतर आणखी एक जोडी विवाहबंधनात अडकत असल्याचं समजतंय. या जोडीच्या केळवणाचे फोटो नुकतेच सोशल मिडीयावर समोर आले आहेत. 

सिध्दार्थ-मितालीनंतर अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील ही जोडी लग्नबंधनात अडकतेय. त्यांच्या केळवणाचे सुरेख फोटो अभिनेत्री मेघा धाडेने इन्स्टाग्रामवरुन चाहत्यांशी शेअर केले आहेत. 

बिग बॉस या  रिएलिटीशोमधून आस्तादने आपल्या रिलेशनशीपची बातमी सर्वांना सांगितली. त्यानंतर स्वप्नाली आणि आस्तादच्या  डेटींगबद्दल स्व चाहत्यांना कळलं. या दोघांचे अनेक रोमॅण्टीक फोटो नेहमीच त्यांच्या सोशल मिडीयावर पाहायला मिळतात.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Megha Dhade (@meghadhade)

 

मेघा धाडेच्या घरच्या केळवणाला मेघाचे पती आदित्य यांच्यासह शिल्पा नवलकर, शाल्मली आणि ज्येष्ठ अभिनेते राजन ताम्हणे यांची खास उपस्थिती होती. 

 

आस्ताद आणि स्वप्नालीने पुढचं पाऊल या मालिकेत एकत्र काम केलं होतं. या मालिकेमुळेच त्यांच्यात आधी मैत्री आणि मग प्रेम फुलत गेलं. आस्ताद-स्वप्नालीच्या केळवणाच्या कार्यक्रमामुळे त्यांच्या लगीनघाईला सुरुवात झाल्याची आनंदवार्ता मिळतेय. सर्वांनाच आता या सेलिब्रिटी जोडीच्या लग्नसोहळ्याची उत्सुकता आहे.  

Recommended

Loading...
Share