सिध्दार्थ-मितालीच्या लग्नात या जोडीवर खिळल्या सर्वांच्या नजरा

By  
on  

गेल्या कित्येक दिवसांपासून सिध्दार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर  या दोघांच्या लग्नाची चर्चा होती. अखेर २४ जानेवारीला ही सेलिब्रिटी जोडी विवाहबंधनात अडकली. पुण्यातील ढेपे वाड्यात हा विवाहसोहळा शाही थाटात पार पडला या लग्नसोहळ्यासाठी कलाविश्वातील अनेक प्रसिध्द कलाकार खास उपस्थित होते.

मराठी मनोरंजनविश्वातील या प्रसिध्द जोडीच्या लग्नसोहळ्यात एका जोडीने सर्वांचंच लक्ष वेधलं. त्यांना यंदा कर्तव्य आहे का, अशीसुध्दा खास मिश्कील शैलीत त्यांच्या फोटोंवर चाहत्यांनी कॉमेंट् केली. ही जोडी म्हणजेच अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे

‘माझा होशील ना’चा नायक आदित्य फेम विराजस आणि ‘सांग तू आहेस का’ मालिकेतील वैभवी म्हणजेच शिवानी रांगोळे हे जोडीने ह्या लग्नसोहळ्यात उपस्थित होते. इतकंच नव्हे तर या लग्नसोहळ्यासाठी त्यांनी खास एकत्र डिझाईन केलेला पोशाखही परिधान केला होता. 

 

 

 

विराजस आणि शिवानीच्या मैत्रीबद्दल सर्वच परिचित आहेत.अनेकदा सोशल मिडीयावर ते एकमेकांसोबतचे गोड फोटो पोस्ट करतात.

आता ही गाढ मैत्री कधी विवाहबंधनात अडकते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 
 

Recommended

Loading...
Share