मानसी नाईकला आहे पतीचा अभिमान, शेअर केला प्रजासत्ताक दिनानिमित्त व्हिडीओ

By  
on  

अभिनेत्री मानसी नाईक तिचा प्रियकर प्रदीप खरेरासोबत अलिकडेच लग्नबंधनात अडकली. शाही थाटात मानसीचा लग्नसोहळा पार पडला. तिच्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन या लग्नसोहळ्याचे सर्व क्षण चाहत्यांना अनुभवता आले. लग्नानंत मानसी तिच्या सासरी म्हणजेच प्रदीपच्या गावी फरीजाबादला रवाना झाली आहे. तिथूनही ती चाहत्यांच्या सतत संपर्कात असते. 

आज प्रजासत्ताक दिन आहे. संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. म्हणूनच या खास दिवशी पती प्रदीप खरेराचा तिला किती अभिमान वाटतो, हे तिने खास व्हिडीओ पोस्ट करत सांगितलं आहे. 

मानसीचा पती हा आंतरराष्ट्रीय पातळीचा बॉक्सर आहे. तो भारतासाठी अनेक मॅचेस खेळतो. म्हणून प्रजासत्ताक दिनी पतीचा अभिमान वाटतो सांगत मानसीने प्रदीप खरेरासोबत हा खास व्हिडीओ शेअर केला आहे. 

 

 

मानसीसारखाच तिच्या पतीचासुध्दा खुप मोठा चाहता वर्ग आहे.  प्रजासत्ताक दिनाच्या या जोडीच्या खास व्हिडीओवर  चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव  केला आहे. 

Recommended

Loading...
Share