‘जीवलगा’ च्या टीमने नववर्षाच्या शोभयात्रेत केली धमाल, दिसले पारंपरिक वेशभुषेत

By  
on  

गुढीपाडव्याच्या शुभ मुहुर्तावर कलाकारांनीही आपल्या सिनेमाचं मालिकेचं प्रमोशन करण्याची संधी सोडली नाही. स्टार प्रवाहवरील आगामी मालिका ‘जीवलगा’च्या संपुर्ण टीमनेही पाडव्याच्या सेलिब्रेशनसहित प्रमोशनचाही सुवर्णमध्य साधला.अमृता खानविलकर, स्वप्नील जोशी, मधुरा देशपांडे आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी नववर्षाच्या शोभयात्रेत पारंपरिक वेशभुषेत हजेरी लावली. स्वप्नीलने ढोल वादनाचा आनंदही घेतला.

जिवलगा या मालिकेतून स्वप्नील ब-याच काळानंतर छोट्या पडद्यावर दिसत आहे. ‘जिवलगा’मध्ये नातेसंबंधांचे अनेक पैलू उलगडत गेलेले प्रेक्षकांना पाहायला मिळतील. मानवी स्वभाव आणि त्यात दाखविलेली प्रगल्भता व विचार करण्याची पद्धत यांची एक वेगळी शैली या कथेतून पुढे येणार आहे. बऱ्याचदा आपली नाती समजून घेण्याची आणि त्यांचे मूल्यमापन करण्याची पद्धत चुकते. आपल्या अवतीभवती असलेल्या माणसांबद्दलचे आपले अंदाज चुकतात. याचा गोष्टींवर ही कथा प्रकाश टाकते. जिवलगा ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या 8 एप्रिलपासून सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वा. पाहता येणार आहे.

Recommended

Loading...
Share