By  
on  

पुन्हा घुमणार ‘एकदम कडक’ आवाज, ‘अश्रुंची झाली फुले’ पुन्हा रंगभूमीवर

सामान्य व्यक्तीच्या जगण्याशी जोडलेलं साहित्य निर्माण करणारे लेखक म्हणजे प्रा. वसंत कानेटकर. त्यांच्या ‘अश्रुंची झाली फुले’ या नाटकाने रसिकांच्या मनाला हात घातला. हेच नाटक पुन्हा एकदा सुबोध भावे पडद्यावर घेऊन येत आहे. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सुबोधने एक व्हिडियो शेअर करत ही बातमी दिली आहे. “आपलं नाणं एकदम खणखणीत वाजतंय, इंटरव्ह्यू एकदम टॉप, एकदम….” अशा आवाजात या व्हिडियोची सुरुवात होताना दिसत आहे.

https://www.facebook.com/subodh.s.bhave/videos/10156026162675776/

यानंतर या नाटकाची माहिती दिसून येत आहे. या नाटकात शैलेश दातार, सीमा देशमुख, उमेश जगताप यांच्या भूमिका असतील. याशिवाय सुबोधही विशेष भूमिकेत दिसणार आहे. ’ हे नाटक सर्वप्रथम ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर पणशीकर यांनी त्यांच्या नाट्यसंपदा संस्थेतर्फे १९६६ मध्ये रंगमंचावर आणले होते. सुबोधमुळे या नाटकाची उत्सुकता वाढली आहे यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive